Team Agrowon
सुरणाचा कंद काहीसा ओबडधोबड, अर्धगोलाकृती, एकंदरीत काहीसा चपटा गर्द तपकिरी रंगाचा असतो आणि आतून किंचित लालसर किंवा किंचित बदामी असतो.
मूळव्याधीच्या नियंत्रणासाठी आहारात सुरणाचा समावेश करावा.
सुरण चिरताना हाताला खाज येते किंवा चिंच न घालता त्याची भाजी केली तर घसा खवखवतो. कारण त्याचा दांडा हिरवा असतो आणि त्यावर फिकट पांढरे ठिपके असतात. तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे.
सुरण अरुची, अग्निमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे व प्लिहेचे विकार यांवर गुणकारी आहे.
संधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते.
आतड्यांच्या तक्रारींवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते.
रताळी, काटेकणगी, करांदे, अरवी, कोनफळ, बटाटा इ. अनेक भाज्यांसाठी उपयुक्त असलेले कंद आहेत.
सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. सुरणाच्या कंदाची बटाट्यासारखी उकडून भाजी करतात.
Summer Heat : थंडगार, चवदार पाण्यासाठी फ्रिजपेक्षा माठचं बरा