Aslam Abdul Shanedivan
नुकताच राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली असून यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत.
महायुतीचा मोठा विजय झाला असून महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. सध्या राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार तयारी केली जात असतानाच
सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदानाच्या याचिकेवर निकाल दिला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने याबाबतची जनहित याचिका फेटाळली आहे
तसेच तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम ठीक असतं, आणि हरल्यावर ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे सांगता, अशी टिप्पणी केली आहे.
या याचिकेतून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्यासह भ्रष्टाचारात गुंतलेल्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली होती
यावरून न्यायालयाने बॅलेट पेपरने मतदान झाल्यास भ्रष्टाचार होणार नाही का, असा सवाल केला आहे.
तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नावाचा उल्लेख करताना, ते हरल्यावर म्हणतात ईव्हीएममध्ये छेडछाड झाली. पण जिंकल्यावर ते असे बोलले नाहीत.