Aslam Abdul Shanedivan
काहीच महिन्यांपुर्वी लोकसभेच्या आणि आता राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला आहे. यामध्ये आमदार आणि खासदार एकाच कुटुंबातील आहेत
गांधी कुटुंबाने देशासाठी खूप काही केलं असून एकाच घरातील दोन व्यक्ती पंतप्रधान होत्या. तर आता राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आई सोनिया गांधी खासदार आहेत.
पवार कुटुंबात शरद पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे खासदार असून रोहित पवार आणि अजित पवार आमदार आहेत
तसेच कोकणातील राणे कुटुंबातील सख्खे भाऊ नितेश आणि निलेश राणे आमदार असून वडिल नारायण राणे खासदार आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत आता पुन्हा एकदा आमदार झाले असून खासदार संदीपान भुमरे यांचे भाऊ विलास भुमरे आहेत.
नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यंदा आमदार झाली असून खासदार सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे आमदार आहेत.
मुंबईतील खासदार वर्षा गायकवाड यांची बहिण ज्योती गायकवाड यंदा निवडून आल्या आहेत. तर राज्यसभा खासदार नितीन पाटील यांचे बंधू मकरंद पाटीलही आता आमदार झाले आहेत.