Anuradha Vipat
चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु ते कधी आणि कसे लावावे याचे काही नियम आहेत.
सूर्यप्रकाश असो वा नसो सूर्याची अतिनील किरणे त्वचेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे दररोज सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.
जर तुम्ही खिडकीपाशी बसून काम करत असाल तर काचेतूनही 'UVA' किरणे आत येऊ शकतात, ज्यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते.
सनस्क्रीनचा प्रभाव साधारण २ ते ३ तासांनंतर कमी होतो. त्यामुळे जर दर ३ तासांनी ते पुन्हा लावणे आवश्यक आहे.
सनस्क्रीनमुळे केवळ सनबर्नच नाही, तर त्वचेचा कर्करोग, काळे डाग आणि सुरकुत्यांपासूनही संरक्षण मिळते
रात्री झोपताना सनस्क्रीन लावण्याची गरज नसते. रात्री चेहरा स्वच्छ धुवून मॉइश्चरायझर लावणे त्वचेसाठी चांगले असते
तुमची त्वचा तेलकट आहे की कोरडी त्यानुसार तुम्ही योग्य प्रकारची सनस्क्रीन लावू शकता.