Anuradha Vipat
मायग्रेनचा त्रास हा सामान्य डोकेदुखीपेक्षा खूप जास्त वेदनादायक असतो.
आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात जे मायग्रेनमधील मळमळ आणि वेदना कमी करतात.
बर्फाचे काही तुकडे टॉवेलमध्ये गुंडाळून ते मान आणि कपाळावर १०-१५ मिनिटे ठेवा.
पेपरमिंट ऑइलने कपाळावर हलका मसाज केल्याने तणाव कमी होऊन मायग्रेनमध्ये त्वरित आराम मिळतो
मायग्रेनमध्ये प्रकाश आणि आवाजाचा त्रास वाढतो. अशा वेळी अंधाऱ्या आणि शांत खोलीत डोळे मिटून १५-२० मिनिटे झोपल्याने मेंदूला शांतता मिळते
शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. आहारात बदाम, काजू, पालेभाज्या आणि डार्क चॉकलेटचा समावेश करा
अनेकदा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे (Dehydration) मायग्रेन ट्रिगर होतो. दिवसभर भरपूर पाणी प्या