Anuradha Vipat
सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. सूर्यफुलाच्या बियात व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांचा साठा असतो.
सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
चला तर मग आज आपण पाहूयात सुर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी कशाप्रकारे वरदान ठरतात.
सुर्यफुलात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
सूर्यफुलाच्या बियांमधील पोषक तत्वे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
सूर्यफुलाच्या बियांमधील व्हिटॅमिन ई, झिंक आणि सेलेनियम हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात
सूर्यफुलाच्या बियांमधील मॅग्नेशियममुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते