Team Agrowon
राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच आहे. अशात आता अतिउष्णता आणि पाणीटंचाईची झळ पिकांना बसत आहे.
राज्यातील काही भागात दुष्काळाची स्थिती तीव्र झाली आहे. पाणीटंचाई असूनही शेतकऱ्यांनी डाळिंबाचा आंबिया बहर धरला आहे.
सध्या या हंगामातील डाळिंब बागा फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. त्यातच अतिउष्णतेमुळे फळांवर असलेल्या बागांना सनबर्निंगचा फटका बसत आहे.
पाणी टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा पिकाला फटाका बसत असल्याने ५० टक्क्यांपर्यंत फूलगळ होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांनी डाळिंबाचा आंबिया बहर धरला आहे. यंदाच्या हंगामात सुमारे २५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी हंगाम साधला आहे.
मधल्या काळातील पोषक वातावरणामुळे बागांचे सेटींग चांगले झाले. त्यामुळे कळी निघण्यास अडचणी आल्या नाहीत. डिसेंबरमध्ये धरलेल्या बागांना आता लहान फळे लागली आहेत.
दरम्यान, पाणीटंचाई तीव्र झाली असून उष्णतेच्या झळाही वाढल्या आहेत. कमी पाण्याच्या बागांना टँकरने पाणी देवून जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे बागांमध्ये फूलगळ होण्यास सुरूवात झाली आहे.