Anuradha Vipat
उन्हाळ्यात रात्री गरम झाल्यामुळे किंवा प्रचंड उकाड्यामुळे अनेकदा शांत झोप लागत नाही.
उन्हाळ्याच्या रात्री गाढ आणि सुखाची झोप घेण्यासाठी आजपासूनच हे सोपे उपाय करून पहा.
झोपण्यापूर्वी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा. गुडघ्यापासून खाली पाय थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
झोपताना सैल आणि हलक्या रंगाचे कॉटनचे कपडे वापरा. बेडवर देखील फक्त सुती चादर अंथरा.
रात्रीच्या जेवणात खिचडी, ताक, किंवा फळभाज्यांचा समावेश करा. झोपण्याच्या किमान २ तास आधी जेवण करा.
झोपण्याच्या १ तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. रूममधील दिवे बंद करा किंवा मंद ठेवा.
रात्री खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून थंड हवा आत येईल.