Anuradha Vipat
निरोगी आणि दीर्घायुषी राहण्यासाठी महागड्या औषधांची नव्हे, तर रोजच्या जीवनात छोट्या पण महत्त्वाच्या बदलांची गरज असते.
जर तुम्ही आजपासूनच आरोग्यदायी जीवनशैली सुरू करण्याचा विचार करत असाल, तर खालील सोप्या सवयी लगेच अंगीकारा.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
जिममध्ये जाणे शक्य नसेल तर फक्त वेगाने चाला किंवा योगासने करा.
पांढरी साखर, पांढरे मीठ आणि मैदा यांचा वापर अत्यंत मर्यादित करा.
रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. जेवणानंतर १५ मिनिटे शतपावली करा.
रात्री झोपण्याच्या १ तास आधी मोबाईल, टीव्ही स्क्रीन पूर्णपणे बंद करा.