Mahesh Gaikwad
पुरेशी झोप न घेतल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण मिळते. कमी झोपेमुळे शरीर आणि मनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
पुरेशी झोप न घेतल्याने विचारशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असते.
कमी किंवा अनियमित झोपे घेतल्यामुळे रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. परिणामी ह्रदयविकार, स्ट्रोकचा धोका वाढतो.
पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. झोपेअभावी ती कमी होते व संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
कमी झोपेमुळे शरीरातील भूक वाढविणारे हार्मोन्स वाढतात, परिणामी वजन वाढण्याची समस्या होते. याशिवाय मधुमेहाचाही त्रास होवू शकतो.
निद्रानाशामुळे मूड बदलणे, चिडचिड होणे या सारख्या समस्या उद्भवतात. तसेच नैराश्य, चिंता यासारखे मानसिक आजार होण्याची शक्यता असते.
कमी झोप किंवा पुरेशी झोप न झाल्यास डोळे कोरडे होतात, दृष्टी धूसर होते आणि डोळ्यांना थकवा जाणवतो.
निरोगी आरोग्यासाठी दररोज किमान ७-८ तास झोप आवश्यक आहे. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.