Anuradha Vipat
उन्हाळ्यातही साबणामुळे त्वचा कोरडी पडू शकते. याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
अनेक साबणांमध्ये 'सोडियम लॉरील सल्फेट'सारखी तीव्र रसायने असतात.
उन्हाळ्यात वारंवार घाम येत असल्याने आपण जास्त वेळा आंघोळ करतो, ज्यामुळे साबणातील रसायने त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतात .
बहुतेक साबण अल्कधर्मी असतात. यामुळे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवणारा संरक्षक थर कमकुवत होतो.
उन्हाळ्यातील उकाड्यामुळे अनेकजण दिवसातून २-३ वेळा साबण लावून आंघोळ करतात.
साबणाऐवजी बेसन आणि साय किंवा मुलतानी मातीचे मिश्रण वापरणे उत्तम ठरते
आंघोळीनंतर त्वचेवर कोरफड जेल किंवा हलके मॉइश्चरायझर लावा