Anuradha Vipat
उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी आणि पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी आहारात बदल करणे खूप गरजेचे असते.
कलिंगड शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि टरबूज शरीरातील उष्णता शोषून घेण्यास मदत करते.
रोजच्या आहारात सॅलड म्हणून काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
दुपारच्या जेवणात दही किंवा ताकाचा समावेश केल्याने पोट थंड राहते, ॲसिडिटी होत नाही.
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स बाहेर पडतात. नारळ पाणी प्यायल्याने पोटॅशियम आणि मिनरल्सची पातळी संतुलित राहते.
पुदिना आपल्या शीतलता देणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. लिंबू सरबत किंवा ताकात पुदिना टाकून घेतल्यास ताजेतवाने वाटते.
कच्चा कांदा उन्हाळ्यात 'लू' पासून वाचवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो.