Healthy Buttermilk Kadhi : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी प्या पौष्टीक ताकाची कढी, पाहा रेसिपी

Anuradha Vipat

ताकाची कढी

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी ताकाची कढी हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे.

Healthy Buttermilk Kadhi | agrowon

साहित्य

ताक,बेसन ,आलं-मिरची पेस्ट,कढीपत्ता,लसूण,जिरे व मोहरी,हिंग,हळद,साखर किंवा गूळ, मीठ, तेल किंवा तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर.

Healthy Buttermilk Kadhi | agrowon

कृती

ताक घ्या. त्यामध्ये बेसन घालून रवीने किंवा विस्करने नीट फेटून घ्या. कढईत १ चमचा तूप किंवा तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जिरे टाका.

Healthy Buttermilk Kadhi | agrowon

पेस्ट

जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालून परता. आता त्यात आलं-मिरचीची पेस्ट आणि हळद घालून हलके परता.

Healthy Buttermilk Kadhi | agrowon

ताक ओता

तयार केलेले ताकाचे मिश्रण कढईत ओता. चवीनुसार मीठ आणि थोडी साखर/गूळ घाला. कढीला सतत ढवळत राहा जेणेकरून ताक फाटणार नाही.

Healthy Buttermilk Kadhi | agrowon

उकळी

मध्यम आचेवर कढीला एक छान उकळी येऊ द्या. कढी जास्त घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालू शकता.

Healthy Buttermilk Kadhi | Agrowon

सजावट

गॅस बंद करा आणि वरून भरपूर ताजी कोथिंबीर घाला.

Healthy Buttermilk Kadhi | Agrowon

Horoscope 16 April 2026 : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Horoscope 16 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...