Tomato Diseases: टोमॅटो उत्पादन वाचवायचे आहे? विषाणूजन्य रोगांवर त्वरित उपाय करा

Swarali Pawar

टोमॅटो पिकात रोग वाढतोय?

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे टोमॅटोवर विषाणूजन्य रोग वाढतात. वेळीच उपाय केल्यास उत्पादन आणि दर्जा वाचवता येतो.

Tomato Disease Control | Agrowon

कोणते रोग जास्त दिसतात?

मोझॅक, क्लोरोसिस, लीफकर्ल आणि बड नेक्रॉसिस हे प्रमुख रोग आहेत. हे रोग मुख्यतः रसशोषक किडींमुळे पसरतात.

Tomato Disease Control | Agrowon

लक्षणे ओळखा

पाने पिवळी पडणे, वाकडी होणे आणि वाढ खुंटणे दिसते. फळे लहान, विकृत आणि रंगहीन होतात.

Tomato Disease Control | Agrowon

उपाय १: रोगग्रस्त भाग काढा

संक्रमित झाडे आणि फळे त्वरित काढून नष्ट करा. यामुळे रोगाचा प्रसार थांबवता येतो.

Tomato Disease Control | Agrowon

उपाय २: किड नियंत्रण करा

मावा, पांढरी माशी आणि फुलकिडे नियंत्रणात ठेवा. पिवळे-निळे चिकट सापळे वापरणे फायदेशीर ठरते.

Tomato Disease Control | Agrowon

उपाय ३: योग्य फवारणी करा

निंबोळी अर्क किंवा जैविक फवारणी नियमित करा. गरजेनुसार शिफारशीनुसार रासायनिक फवारणी वापरा.

Tomato Disease Control | Agrowon

प्रतिबंधात्मक उपाय करा

रोगप्रतिरोधक जाती निवडा आणि रोपे सुरक्षित ठेवा. नायलॉन जाळी आणि फेरपालट केल्यास रोग कमी होतो.

Tomato Disease Control | Agrowon

नियमित निरीक्षण महत्त्वाचे

दर ८-१० दिवसांनी पिकाची पाहणी करा. वेळीच उपाय केल्यास नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते.

Tomato Disease Control | Agrowon

Turmeric Cultivation: हळद लागवडीपूर्वी जमिनीची तयारी कशी कराल? हळद लागवडीपूर्वी जमिनीची तयारी कशी कराल?

अधिक माहितीसाठी...