Sugarcane Juice For Kids : लहान मुलांना उसाचा रस देताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

Anuradha Vipat

उत्तम

लहान मुलांना उसाचा रस देणे शरीराला थंडावा आणि झटपट ऊर्जा देण्यासाठी उत्तम मानले जाते.

Sugarcane Juice For Kids | agrowon

१ वर्षाखालील मुलं

बालरोगतज्ज्ञांच्या मते, १ वर्षाखालील लहान मुलांना उसाचा रस अजिबात देऊ नये.

Sugarcane Juice For Kids | Agrowon

महत्त्वाच्या गोष्टींची काळजी

१ वर्षापेक्षा मोठ्या मुलांना उसाचा रस देताना पालकांनी आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने खालील महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Sugarcane Juice For Kids | Agrowon

ताजा आणि घरगुती रस

रस्त्यावरील आधीच काढून ठेवलेला किंवा साठवलेला रस मुलांना देऊ नका; यामुळे पोट खराब होऊन उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात .

Sugarcane Juice For Kids | Agrowon

प्रमाण

उसाच्या रसात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. १ ते ३ वर्षांच्या मुलांना एका दिवसात ३० ते ५० मिली पेक्षा जास्त रस देऊ नये .

Sugarcane Juice For Kids | Agrowon

पाणी मिसळून द्या

लहान मुलांची पचनसंस्था संवेदनशील असते. त्यामुळे त्यांना उसाचा रस देताना त्यात थोडे स्वच्छ पाणी मिक्स करून देणे अधिक सुरक्षित ठरते.

Sugarcane Juice For Kids | Agrowon

उपाशी पोटी

मुलांना कधीही रिकाम्या पोटी उसाचा रस देऊ नका. अन्न किंवा नाश्ता केल्यानंतरच हा रस द्यावा, जेणेकरून शरीरात साखर एकदम शोषली जाणार नाही.

Sugarcane Juice For Kids | Agrowon

Gauri Pujan 2026 : वैवाहिक जीवनातील कलह होतील कायमचे दूर! गौरी पूजनाला देवीच्या चरणी अर्पण करा 'या' वस्तू

Gauri Pujan 2026 | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...