Anuradha Vipat
ज्येष्ठा गौरी पूजन हा सण महिलांसाठी अखंड सौभाग्य, सुख-समृद्धी आणि सुखी संसाराची प्रार्थना करण्याचा अतिशय पवित्र काळ आहे.
धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार, देवी गौरी ही माता पार्वतीचे रूप असून ती आदर्श वैवाहिक जीवनाची अधिष्ठात्री देवता मानली जाते.
वैवाहिक जीवनात सतत तणाव असेल तर गौरी पूजनाच्या दिवशी देवीच्या चरणी 'या' खास सौभाग्य वस्तू अर्पण केल्याने सर्व कलह कायमचे दूर होतात:
गौरी पूजनाच्या दिवशी देवीला हळद-कुंकू, काजळ, मेहंदी, सिंदूर, अत्तर, फणी, आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्र अर्पण करा.
देवी गौरीला १६ हिरव्या काचेच्या बांगड्यांची जोडी अर्पण करा. यातील काही बांगड्या नंतर स्वतः हातामध्ये परिधान कराव्यात.
दोन विड्याची पाने, सुपारी, खारीक, बदाम आणि त्यासोबत चांदीचे नवीन जोडवे देवीच्या चरणाजवळ ठेवा.
गौराईला अत्यंत आदराने सुबक खण किंवा सुंदर नऊवारी साडी नेसवा किंवा तिच्या चरणी अर्पण करा.