Sugarcane Crop Care: गारपीट आणि अवकाळीत उसाची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स!

Swarali Pawar

ऊस संकटात! काय कराल?

गारपीट आणि वादळी पावसामुळे उसाला मोठा धोका निर्माण होतो. अशा वेळी तात्काळ योग्य उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे.

Sugarcane Protection Tips | Agrowon

पिकावर काय परिणाम होतो?

पानं फाटतात, कांड्यांना जखमा होतात. यामुळे वाढ कमी होते आणि उतारा घटतो.

Sugarcane Protection Tips | Agrowon

रोगांचा धोका वाढतो

जखमांमधून बुरशी आणि जीवाणू सहज प्रवेश करतात. यामुळे लाल कुज, स्मटसारखे रोग वाढतात.

Sugarcane Protection Tips | Agrowon

पाणी साचल्यास काय कराल?

शेतात साचलेलं पाणी तात्काळ बाहेर काढा. योग्य निचरा केल्याने मुळांना ऑक्सिजन मिळतो.

Sugarcane Protection Tips | Agrowon

बुरशीनाशक फवारणी

जखमा भरून येण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करा. ट्रायकोडर्मा किंवा कॉपरयुक्त औषध उपयोगी ठरते.

Sugarcane Protection Tips | Agrowon

पिकाला बूस्टर

२% युरिया किंवा १% 19:19:19 खताची फवारणी करा. यामुळे पिकाला ताकद मिळून वाढ सुधारते.

Sugarcane Protection Tips | Agrowon

मुळांची वाढ वाढवा

प्रति एकर १ लिटर ह्यूमिक अॅसिड पाण्यातून द्या. यामुळे मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्य शोषण वाढते.

Sugarcane Protection Tips | Agrowon

खत व्यवस्थापन

रासायनिक खत सेंद्रिय खतांसोबत द्या. यामुळे पिकाची वाढ आणि उत्पादन दोन्ही सुधारते.

Sugarcane Protection Tips | Agrowon

Livestock Care in Rain: गारपीट आणि वादळी पावसात जनावरांची काळजी कशी घ्यावी?

अधिक माहितीसाठी...