Livestock Care in Rain: गारपीट आणि वादळी पावसात जनावरांची काळजी कशी घ्यावी?

Swarali Pawar

संकटाचा इशारा

सध्या गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता वाढली आहे. अशा वेळी जनावरांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची असते.

Storm Safety Animals | Agrowon

हवामानाचा अंदाज

दररोज हवामानाचा अंदाज तपासत राहा. इशारा मिळताच जनावरांना त्वरित सुरक्षित ठिकाणी आणा.

Storm Safety Animals | Agrowon

झाडाखाली बांधू नका

वादळी वाऱ्यात झाडे पडण्याचा धोका असतो. म्हणून जनावरांना झाडाखाली बांधणे टाळा.

Storm Safety Animals | Agrowon

मजबूत निवारा द्या

शेडची पत्रे उडू शकतात, त्यामुळे मजबूत गोठा आवश्यक आहे. जनावरांना सुरक्षित आणि भक्कम निवाऱ्यात ठेवा.

Storm Safety Animals | Agrowon

पावसापासून संरक्षण

गोठ्यात पाणी येऊ नये म्हणून ताडपत्री लावा. गोठा ओला राहिल्यास जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

Storm Safety Animals | Agrowon

पाणी आणि वेळेचे नियोजन

जनावरांना दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे. दुपारी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चरायला सोडू नका.

Storm Safety Animals | Agrowon

स्वच्छता आणि कीटक नियंत्रण

गोठा स्वच्छ व कोरडा ठेवा, चुन्याचा वापर करा. गोचीड, मच्छर टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करा.

Storm Safety Animals | Agrowon

लसीकरण आणि आरोग्य काळजी

लाळ्या खुरकूत व आंत्रविषार यांसारख्या लसी वेळेवर द्या. दुधाळ जनावरांची कास स्वच्छ ठेवा आणि संसर्ग टाळा.

Storm Safety Animals | Agrowon

Ice cream in Summer: उन्हाळ्यात आइस्क्रिम खाल्ल्याने उष्णता वाढते का?

अधिक माहितीसाठी...