Swarali Pawar
उसाच्या सुरुवातीच्या वाढीत बाळबांधणी करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे ऊसाला आधार मिळतो आणि अनावश्यक फुटवे मर्यादित ठेवता येतात.
लागवडीनंतर साधारण ४५ ते ६० दिवसांनी बाळबांधणी करावी. मात्र दिवसांपेक्षा फुटव्यांची संख्या आणि उसाची वाढ पाहणे महत्त्वाचे आहे.
उसाला साधारण सहा ते सात फुटवे दिसू लागल्यावर बाळबांधणीची योग्य वेळ समजावी. रिव्हर्स पॉवर टिलरने दोन ओळींमधील माती बुडख्याकडे व्यवस्थित लावा.
बाळबांधणी करताना माती उसाच्या बुडख्याला व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. यामुळे पुढील मोठ्या बांधणीवेळीही चांगली भर मिळण्यास मदत होते.
बाळबांधणीमुळे उसाचे अनावश्यक फुटवे मर्यादित ठेवता येतात. योग्य ऊससंख्येमुळे प्रत्येक उसाला वाढीसाठी पुरेशी जागा मिळते.
मातीचा थर देताना एखादी कांडी खाली बुडेल एवढीच माती द्या. कोवळे कोंब पूर्ण झाकले जाणार नाहीत, याची काळजी घ्या.
जमीन खूप ओली किंवा खूप कोरडी असताना बाळबांधणी करू नका. योग्य वाफसा असताना माती व्यवस्थित उचलून बुडख्याला लावता येते.Sugarcane Crop Management
उसाच्या जातीप्रमाणे फुटव्यांची वाढ वेगवेगळी असल्याने बाळबांधणीची वेळ बदलू शकते. त्यामुळे दिवस न मोजता फुटव्यांची वाढ आणि शेताची परिस्थिती पाहून निर्णय घ्या.