Sakhar Gathi Market : साखर गाठी उद्योगाला महागाईची झळ

Team Agrowon

होळीचा सण तोंडावर आला असून बाजारात साखरमाळेची (गाठी) मागणी वाढली आहे.

Sakhar Gathi Market | Agrowon

साखरेसह इतर कच्चा माल आणि कामगारांच्या वेतनात वाढ झालेली आहे. परिणामी, गाठींचे भावही २० टक्क्यांनी वाढले आहेत.

Sakhar Gathi Market | Agrowon

नागपुरातील गाठी विदर्भासह मध्यप्रदेशातील बाजारात विक्रीसाठी जातात. गेल्या काही वर्षांमध्ये गाठीविक्रीचा व्यवसाय ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला आहे.

Sakhar Gathi Market | Agrowon

नागपुरातील इतवारी, हंसापुरी खदान, हुडकेश्वर, शांतिनगर येथून येणारे उत्पादन मजुरांअभावी कमी झाले आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे.

Sakhar Gathi Market | Agrowon

यंदा ५० ग्रॅमपासून पाच किलोपर्यंतची गाठ उपलब्ध आहे. फॅन्सी गाठींची विक्री नगाप्रमाणे होते. त्याचा दर आठशे रुपयांपासून आहे.

Sakhar Gathi Market | Agrowon

‘साखरेसह इंधन, साखर पावडर, दोरा, दूध या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे. मजुरीचा प्रश्‍न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजूर मिळत नाहीत, यामुळे हा उद्योग अडचणीत आहे.

Sakhar Gathi Market | Agrowon

होळीचा सण जवळ आल्याने गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरवात झाली आहे. गाठींचा किरकोळ विक्रीचा भाव १२० ते १४० रुपये किलो आहे. तर ठोक ७० ते ८० रुपये किलो आहे.

Sakhar Gathi Market | Agrowon