sandeep Shirguppe
आपलं आरोग्य आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी झोप हा महत्वाचा भाग आहे. परंतु भारतात अनेक लोकांना रात्री नीट झोप येत नाही.
रेसमेडने केलेल्या 'स्लीप सर्वेक्षण २०२४' मध्ये भारतासह १७ देशांमधील ३६,००० लोकांच्या झोपेचा आढावा घेतला.
यामध्ये भारतात फक्त २७% लोकांना चांगली झोप लागते आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ८४ टक्के इतके होते.
रात्री उशिरापर्यंत मोबाइल, संगणकावर वेळ घालवणे आणि वाढता तणाव यामुळे लोकांची झोप उडाली आहे.
४२ टक्के लोकांनी सांगितले की त्यांना कामातील असलेल्या तणावामुळे झोप येत नाही.
वैयक्तिक चिंता ३६%, निद्रानाश २५%, श्वास घेण्यास त्रास १५%, लठ्ठपणा १३% या कारणामुळे चांगली झोप येत नाही.
झोपण्यापूर्वी चांगली पुस्तके वाचण्याची सवय लावा. बेडरूमचे वातावरण शांत आणि आरामदायी ठेवावे.
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. सर्दी आणि ताप हे आजार वाढतात लठ्ठपणाचा धोका वाढतो.