Anuradha Vipat
आहारातून साखर कमी करायची असेल तर केवळ गोड पदार्थ सोडणे पुरेसे नसते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि साखरेची ओढ कमी करण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
अंडी, कडधान्ये, पनीर, डाळी किंवा नट्स खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि फळांमध्ये भरपूर फायबर असते. फायबर साखरेचे पचन संथ करते, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी स्थिर राहते.
जर तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली, तर साखरेऐवजी खजूर, मनुके किंवा ताजी फळे खा.
चहा किंवा कॉफीमध्ये साखरेऐवजी दालचिनी पावडर वापरा. दालचिनी नैसर्गिकरित्या गोडवा देते आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवते .
अपुऱ्या झोपेमुळे शरीरात 'घ्रेलीन' वाढते आणि 'लेप्टिन' कमी होते. यामुळे शरीराला ऊर्जेसाठी साखरेची गरज भासते.