Roshan Talape
मायग्रेन ही तीव्र डोकेदुखी असून, पुढील घरगुती उपाय मायग्रेनचा त्रास नैसर्गिकरीत्या कमी करू शकतात.
१ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा साखर एकत्र करून सेवन केल्यास आराम मिळतो.
कपाळावर लवंग तेलाने हळूवार मालिश केल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
शांत जागी डोळे बंद करून खोल श्वास घेणे, ध्यान केल्याने मेंदूचा ताण कमी होतो.
१५-२० मिनिटांसाठी कपाळावर थंड पाण्याचा किंवा बर्फाचा शेक दिल्यास डोकेदुखी कमी होते.
एक कप चहा किंवा कॉफी मध्ये असलेले कॅफीन डोकेदुखी थांबवण्यात मदत करू शकते.
हळद सूज आणि वेदना कमी करते. झोपण्याआधी गरम दूधात अर्धा चमचा हळद घालून प्यावे.
आले सूज कमी करण्यास उपयोगी ठरते, म्हणून गरम पाण्यात अर्धा चमचा आले पावडर घालून दिवसातून १-२ वेळा प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.