Roshan Talape
शाकाहारी आहारातूनही प्रथिनं मिळू शकतात. त्यामुळे बॉडी बिल्डिंगसाठी मांस खाण्याची गरज नाही. आता पाहूया काही शाकाहारी प्रथिनयुक्त पर्याय!
दूध, दही आणि पनीर यामध्ये नैसर्गिक प्रथिनं असतात, जी स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.
स्नॅक म्हणून शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड खावेत. यात प्रथिनांसोबतच चांगले फॅट्सही मिळतात.
सोयाबीनमध्ये ३६ ते ४० टक्के प्रथिनं असतात, त्यामुळे ते शाकाहारी प्रथिनांचं उत्तम स्रोत आहे.
ओट्स, बाजरी, नाचणी आणि गहू या धान्यांमध्ये चांगली प्रथिनं असतात, त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी ते निवडा.
ब्रोकोली, पालकसारख्या हिरव्या भाज्यांमध्येही प्रथिनं असतात आणि त्या शरीरासाठी खूप पोषणदायक असतात.
राजमा, हरभरा आणि मसूर यांसारख्या डाळींपासून शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटही बराच वेळ भरलेलं राहते.
मूग, चवळी आणि इतर कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असल्याने, त्यांचा दररोजच्या आहारात समावेश करावा.