Mahesh Gaikwad
शरीरात युरीक अॅसिड वाढल्यामुळे टाचदुखी, सांधेदुखी आणि सूज येते. शरीरातील युरीक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
लिंबूमध्ये असणारे व्हिटामिन-सी शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्यास मदत करते.
युरीक अॅसिड कमी करण्यासाठी काकडी उत्तम आहे. काकडीमुळे युरीक अॅसिड कमी होण्यासह मुत्रपिंडही स्वच्छ राहते.
सफरचंद, चेरी, स्ट्रॉबेरी, संत्री यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे युरिक अॅसिड नियंत्रित करतात.
दररोज सकाळी एक ग्लाल कोमट पाण्यात ओवा घालून प्यायल्यास युरीक अॅसिडमुळे होणरी सांधेदुखी कमी होते.
मेथी दाण्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक असतात. रात्रभर एक चमचा मेथी दाणे भिजवलेले पाणी पिल्यास युरीक अॅसिडचा कमी होते.
रोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने सांध्यातील युरीक अॅसिड कमी करण्यास मदत होते.
पालक, मेथी, कोथिंबीर यामध्ये फायबर भरपूर असते, जे युरिक अॅसिडची निर्मिती कमी करते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.