Mahesh Gaikwad
निरोगी आरोग्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, एका दिवसात किती अंडी खाल्ली पाहिजेत?" हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
अंडी पौष्टिक असली तरी मर्यादेत खाल्ली तरच आरोग्यासाठी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेवूयात एका दिवसात किती अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स बी-१२, डी, मिनरल्स, चांगले फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात.
सर्वसाधारणपणे आरोग्याच्यादृष्टीने १ ते २ अंडी दररोज खाणे सुरक्षित मानले जाते. हे प्रमाण वय, शारीरिक हालचाल आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते.
जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यास कोलेस्टेरॉल वाढू शकतो. विशेषतः अंड्याचा पिवळा भाग जास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
बॉडीबिल्डर किंवा शारिरीक श्रमाची कामे करणाऱ्यांनी दिवसाला ३-५ अंडी खाल्ली तरी चालतात. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लहान मुलांना दररोज १ अंडे दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती, वाढते आणि मेंदूचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
दररोज १ ते २ अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ल्यानेच आहारात अंड्याचा सामावे करावा.