Anuradha Vipat
बदलते हवामान, त्वचेचा कोरडेपणा, घाम किंवा ॲलर्जी यामुळे अंगावर खाज येऊ शकते.
खोबरेल तेलात थोडा भीमसेनी कापूर बारीक करून मिसळा आणि हे तेल खाज येणाऱ्या भागावर हलक्या हाताने लावा.
पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून ते पाणी चांगले उकळा आणि कोमट झाल्यावर त्या पाण्याने आंघोळ करा.
ताज्या कोरफडीचा गर त्वचेवर लावल्याने जळजळ, लालसरपणा आणि खाजेपासून त्वरित आराम मिळतो. कोरफडीमुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो.
बारीक वाटलेले ओट्स कोमट पाण्यात मिसळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेची जळजळ शांत होते आणि कोरड्या त्वचेची खाज थांबते.
ज्या ठिकाणी जास्त खाज येत आहे, तिथे स्वच्छ सुती कापड थंड पाण्यात भिजवून ५ ते १० मिनिटे ठेवा. यामुळे त्वचेतील खाजेची संवेदना कमी होते.
आंघोळ केल्यानंतर त्वचा हलकी ओलसर असतानाच संपूर्ण अंगाला सुगंधविरहित मॉइश्चरायझर किंवा लोशन लावा.