Anuradha Vipat
मंगळवार हा दिवस मंगळ ग्रह आणि संकटमोचन हनुमानजींना समर्पित असून या दिवशी काही कृती केल्यास आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे.
मंगळवारी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये किंवा कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. या दिवशी घेतलेले कर्ज फेडणे कठीण होते.
मंगळवारी केस कापणे, दाढी करणे किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते. यामुळे आयुष्य कमी होते.
मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे टाळावे. तसेच या दिवशी लोखंडाच्या वस्तू, धारदार शस्त्रे किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार करणे टाळावे.
मंगळवार हा भगवान हनुमान आणि मंगलमूर्ती गणेशाच्या उपासनेचा दिवस मानला जातो.
मान्यतेनुसार मंगळवारी दुधापासून बनवलेले पदार्थ विकत घेणे किंवा दान करणे टाळावे; त्याऐवजी गुळाचे किंवा बुंदीचे लाडू अर्पण करावेत.
मंगळवारी पश्चिम आणि उत्तर दिशेला प्रवास करणे टाळावे. तसेच मंगळ हा अग्नी तत्वाचा ग्रह असल्याने या दिवशी राग, वादविवाद किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे.