Anuradha Vipat
हँडबॅग ही प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमधील एक महत्त्वाची अॅक्सेसरी आहे
योग्य हँडबॅग तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालू शकते, तर चुकीची निवड संपूर्ण लुकचा प्रभाव कमी करू शकते.
ऑफिस, कॉलेज, ट्रॅव्हल, पार्टी किंवा दैनंदिन वापरासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स योग्य ठरतात.
बॅगचा आकार तुमच्या गरजेनुसार असावा. खूप मोठी किंवा खूप लहान बॅग निवडल्यास ती वापरण्यास असुविधाजनक ठरू शकते.
काळा, बेज, ब्राउन, टॅन किंवा नेव्ही ब्लू यांसारखे न्यूट्रल रंग बहुतेक कपड्यांसोबत सहज जुळतात.
फॉक्स लेदर, कॅनव्हास, नायलॉन किंवा इतर मजबूत मटेरियलचा पर्याय निवडू शकता.
हँडबॅगचा स्ट्रॅप मजबूत आणि आरामदायी असावा. खांद्यावर बॅग घेण्याची सवय असल्यास रुंद स्ट्रॅप्स अधिक सोयीस्कर ठरतात.