Anuradha Vipat
आयर्न हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. हे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असते.
शरीरात आयर्नची कमतरता झाल्यास आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतो.
पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर ते आयर्नच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
हिमोग्लोबिन कमी झाल्यास त्वचा, ओठ आणि नखांचा रंग फिकट दिसू शकतो.
मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे वारंवार चक्कर येऊ शकते.
थोडे चालल्यावर किंवा जिने चढल्यावर दम लागणे हे देखील आयर्नच्या कमतरतेचे संकेत असू शकतात.
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे वारंवार डोकेदुखी होऊ शकते.