Anuradha Vipat
तुमच्या अभ्यासावरचं लक्ष केंद्रित करण्यासाठी काही सवयी अत्यंत हानिकारक ठरू शकतात.
आज आपण पाहूयात तुमच्या अभ्यासावरचं लक्ष बिघडवणाऱ्या प्रमुख सवयी कोणत्या आहेत.
अभ्यासादरम्यान फोन जवळ ठेवल्याने सतत नोटिफिकेशन चेक करण्याची सवय लागते. यामुळे लक्ष केंद्रित होतं नाही.
अभ्यास करण्याची वेळ पुढे ढकलण्याची सवय यामुळे अभ्यास होत नाही.
एकाच वेळी अभ्यास करणे, टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे किंवा चॅटिंग करणे यामुळे अभ्यास होत नाही.
झोपेच्या कमतरतेमुळे मेंदू थकून जातो, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.
अभ्यासाचे टेबल किंवा खोली अस्ताव्यस्त असल्यास, मन विचलित होते आणि लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.