Winter Smart Kitchen Hacks : थंडीत खोबरेल तेल आणि तूप घट्ट गोठून बसतंय? बाटली न कापता 'या' सोप्या ट्रिक्सने करा झटपट पातळ!

Anuradha Vipat

सामान्य समस्या

थंडीच्या दिवसांत तापमान कमी झाल्यामुळे तूप आणि खोबरेल तेल घट्ट गोठणे ही एक सामान्य समस्या आहे.

Winter Smart Kitchen Hacks | agrowon

गरम पाण्याचा वापर

भांड्यात कोमट किंवा गरम पाणी घ्या आणि त्यात तूप किंवा तेलाची बरणी काही मिनिटे ठेवा. यामुळे बरणीच्या कडेचे तेल किंवा तूप लगेच वितळते.

Winter Smart Kitchen Hacks | agrowon

रुंद तोंडाच्या बरणीत साठवणूक

हिवाळा सुरू होण्यापूर्वीच तूप किंवा खोबरेल तेल अरुंद बाटलीतून काढून स्टील किंवा काचेच्या रुंद तोंडाच्या बरणीत भरून ठेवा. यामुळे चमच्याने ते काढणे सोपे जाते.

Winter Smart Kitchen Hacks | agrowon

स्वयंपाक करताना गॅसजवळ ठेवा

जेवण बनवताना गरम तवा किंवा कढईच्या बाजूला तूप किंवा तेलाची बरणी ठेवा. गॅसच्या उष्णतेमुळे ते आपोआप मऊ होते.

Winter Smart Kitchen Hacks | agrowon

गरम चमचा वापरा

जर तुम्हाला अगदी थोडेच तूप किंवा तेल हवे असेल, तर चमचा गॅसवर किंचित गरम करा आणि त्या गरम चमच्याने बरणीतून तूप किंवा तेल काढा.

Winter Smart Kitchen Hacks | agrowon

सूर्यप्रकाशात ठेवा

सकाळी कोवळ्या उन्हात खिडकीजवळ किंवा बाल्कनीत तूप आणि तेलाच्या बरण्या अर्धा तास ठेवा. नैसर्गिक उष्णतेमुळे ते छान वितळते.

Winter Smart Kitchen Hacks | agrowon

गरम भात किंवा पोळीवर ठेवा

जेवताना तूप गोठलेले असेल, तर ते थेट गरम भाताच्या आत दाबून ठेवा किंवा गरम पोळीच्या घड्यांमध्ये ठेवा; काही सेकंदांत ते वितळेल.

Winter Smart Kitchen Hacks | agrowon

मायक्रोवेव्हचा वापर

बरणी काचेची किंवा मायक्रोवेव्ह-सेफ असेल, तर झाकण काढून फक्त १५ ते २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करा.

Winter Smart Kitchen Hacks | agrowon

Winter Chai : थंडीत चहाला द्या शाही चव आणि उबदारपणा! मसाला चहा बनवताना वापरा 'हा' खास पदार्थ

Winter Chai | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...