Anuradha Vipat
शरीरात उष्णता वाढणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे.
जेव्हा आपले शरीर बाहेरील वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही तेव्हा शरीरात उष्णता वाढू लागते.
अतिप्रमाणात तिखट, तेलकट, मसालेदार, आणि जंक फूड खाण्यामुळे शरीरातील पित्त वाढून उष्णता वाढते.
दिवसातून पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडत नाहीत, ज्यामुळे अंतर्गत उष्णता वाढते.
उन्हाळ्यात कडक ऊन किंवा जास्त दमट वातावरणामुळे शरीराचे तापमान वाढते.
काही अँटीबायोटिक्स किंवा तीव्र औषधांच्या अतिसेवनामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
थायरॉईडची समस्या, शरीरात इन्फेक्शन असणे किंवा महिलांमध्ये रजोनिवृत्ती दरम्यान उष्णता वाढते.