Anuradha Vipat
रात्री शांत आणि गाढ झोप न येणे ही सध्याच्या धावपळीच्या युगात एक अत्यंत सामान्य समस्या बनली आहे.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप अत्यंत आवश्यक असते.
ऑफिसचे काम, कौटुंबिक चिंता किंवा भविष्यातील विचार यामुळे मेंदू सतत सक्रिय राहतो आणि झोप उडते.
झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहिल्याने त्यातून निघणारा 'ब्लू लाईट' शरीरातील मेलाटोनिन कमी करतो.
रात्री उशिरा जड किंवा तेलकट जेवण करणे, तसेच संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा अल्कोहोलचे सेवन करणे.
रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट दुधात चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्या.दूध आणि जायफळ नैसर्गिक निद्राजनक मानले जातात, ज्यामुळे मन शांत होते.
झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल हलके कोमट करून तळपायांना ५-१० मिनिटे मालिश करा.