Anuradha Vipat
वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला अत्यंत पवित्र, शुद्ध आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
चिखलात रुजूनही अत्यंत सुंदर आणि अलिप्त राहणारे हे फूल घरात ठेवल्याने अनेक धार्मिक आणि वास्तू फायदे मिळतात.
पूजेमध्ये देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण केल्याने ती अत्यंत प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
भगवान विष्णूच्या हातात कमळ असते, तर ब्रह्मदेव स्वतः कमळातून प्रकट झाले आहेत. त्यामुळे हे फूल घरात ठेवल्याने विष्णू, लक्ष्मी आणि ब्रह्मा या तिन्हींचा आशीर्वाद प्राप्त होतो.
कमळाचे फूल मोक्ष, ज्ञान आणि आत्मिक शुद्धतेचे प्रतीक आहे. ते घरात ठेवल्याने सदस्यांमध्ये सद्बुद्धी आणि चांगल्या कर्माची भावना वाढते.
घरात कमळाचे फूल किंवा त्याचे रोप ठेवल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
वास्तू दोषामुळे जर पैशांची आवक थांबली असेल किंवा विनाकारण खर्च होत असेल, तर घरात कमळ ठेवल्याने आर्थिक अडसर दूर होतात आणि धनवृद्धी होते.