Weight Loss Mistakes : वेट लॉसचा प्रवास ठरतोय अपयशी? जाणून घ्या वजन घटवताना टाळायच्या महत्त्वाच्या चुका

Anuradha Vipat

वजन

वजन कमी करण्यासाठी अनेक जण खूप कष्ट करतात, पण काहीवेळा सर्व प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही.

Weight Loss Mistakes | agrowon

चुका

वजन कमी करताना निरोगी पद्धतीने ध्येय गाठण्यासाठी काही प्रमुख चुका टाळल्या पाहिजेत.

Weight Loss Mistakes | Agrowon

कडक डाएटिंग

अनेक जण वजन लवकर कमी करण्यासाठी अचानक जेवणे सोडतात किंवा अगदी कमी खातात. यामुळे मेटाबॉलिज्म सुस्त होते आणि डाएटिंग सोडताच वजन दुप्पट वेगाने वाढते.

Weight Loss Mistakes | agrowon

झोप आणि मानसिक ताण

कमी झोप आणि सततचा ताण यामुळे पोटाची चरबी वाढते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप आवश्यक आहे.

Weight Loss Mistakes | Agrowon

फक्त व्यायाम करणे

वजन कमी करण्याच्या प्रवासात फक्त २०% वाटा व्यायामाचा असतो. तुम्ही कितीही व्यायाम केला, तरी कॅलरीजचे नियंत्रण न केल्यास वजन कमी होणार नाही.

Weight Loss Mistakes | agrowon

लिक्विड कॅलरीज

जेवणावर नियंत्रण ठेवताना अनेक जण पॅकबंद फळांचे रस, चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स यांमधून किती कॅलरीज शरीरात जात आहेत याकडे लक्ष देत नाहीत.

Weight Loss Mistakes | Agrowon

वजन काटा

दिवसातून तीन-चार वेळा वजन मोजल्याने केवळ मानसिक ताण वाढतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण, स्नायूंचे वजन यांमुळे वजनात सतत बदल होत असतो.

Weight Loss Mistakes | agrowon

Boost Metabolism Naturally : चयापचय क्रिया वाढवा नैसर्गिकरित्या: हे ५ घरगुती ड्रिंक्स बदलतील तुमचा फिटनेस

Boost Metabolism Naturally | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...