Anuradha Vipat
शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, चरबी वेगाने बर्न करण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म वेगवान असणे खूप गरजेचे आहे.
सकाळी रिकाम्या पोटी खालील घरगुती पेयांचे सेवन केल्यास मेटाबॉलिज्म नैसर्गिकरित्या सुधारण्यास मोठी मदत होते.
दालचिनी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते आणि मेटाबॉलिज्मचा वेग वाढवते.
जिरे आणि ओवा पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात.
ग्रीन टी मध्ये 'कॅटेचिन्स' नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे थेट मेटाबॉलिज्म वाढवण्याचे काम करतात. पुदिना यामुळे पचनास हलका आणि चवीला फ्रेश बनवतो.
आल्यामध्ये 'जिंजरॉल' नावाचे तत्व असते, जे शरीराचे तापमान नियंत्रित करून कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. लिंबामधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.