Anuradha Vipat
स्ट्रीट स्टाईल व्हेज कबाब घरच्या घरी बनवण्यासाठी ही सोपी आणि चविष्ट रेसिपी फॉलो करा.
उकडलेले बटाटे, किसलेलं गाजर, बीन्स, कडलेले मटार, ब्रेड क्रम्ब्स किंवा भाजलेलं बेसन, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला, आलं-लसूण-मिरची पेस्ट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तेल.
उकडलेले बटाटे मॅश करून त्यात गाजर, बीन्स आणि मटार एकत्र करा आणि आलं-लसूण-मिरची पेस्ट, सर्व सुके मसाले, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना घालून नीट मिक्स करा.
मिश्रणात ब्रेड क्रम्ब्स किंवा बेसन घाला. हाताला थोडे तेल लावून मिश्रणाचे लहान गोळे करा.
एका पॅनमध्ये कबाब दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
हे कबाब पुदिना चटणी, कांद्याची लडी आणि लिंबासोबत गरमागरम सर्व्ह करा.