Team Agrowon
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात गुलाबी क्रांती येणार आहे.
पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून स्ट्रॉबेरी सारख्या नगदी पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे.
यासाठी आदिवासी उपाययोजने अंतर्गत २५८ शेतकऱ्यांना १ कोटी २० लाख ७४ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
पाच गुंठे जागेच्या प्रकल्पात स्ट्रॉबेरीची रोपे, लागवड साहित्य, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर आदी साहित्य शेतकऱ्यांना योजनेतून देण्यात येईल.
प्रति लाभार्थी शेतकऱ्याचा खर्च ४६ हजार ८०० रुपये आहे. तसेच खर्चामध्ये प्रति लाभार्थी सहभाग एकूण प्रकल्पाच्या १५ टक्क्यांप्रमाणे १८ लाख ११ हजार १६० रुपये आहे
या प्रकल्पामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनमानात होणाऱ्या बदलावर आदिवासी आयुक्त शासनास अहवाल सादर करणार आहेत.