sandeep Shirguppe
कुठल्याही सिझनमध्ये फ्लॉवर हमखास मिळतो. पण, थंडीच्या दिवसांत चांगला आणि फ्रेश मिळतो.
फुलकोबीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, के, बी 6 आणि फोलेट यासारखे पोषक घटक असतात.
इतर आहारातील पदार्थांपेक्षा फुलकोबीमध्ये १० टक्के फायबर जास्त असल्याने नियमीत सेवन करावे.
फुलकोबी निमयीत खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आदी विविध आजारांचा धोका कमी होतो.
"कोलीन" हे पोषक तत्व आहे. ते मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये आणि चयापचय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते.
फुलकोबी खाल्ल्याने तुम्हाला पुरेशा प्रमाणात कोलीन मिळते. त्यामुळे तुमची विचारशक्ती चांगली राहते.
फुलकोबी दाहक-विरोधी गुणधर्मासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.
फुलकोबीमध्ये फक्त २५ टक्के कॅलरीज आहेत. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर फुलकोबी खाणे चांगला पर्याय ठरेल.