Ancient Wisdom : आधुनिक यंत्रांशिवाय प्राचीन लोक संकटांची चाहूल कशी ओळखायचे?

Anuradha Vipat

निसर्गाशी घट्ट

आजच्यासारखी आधुनिक यंत्रसामग्री किंवा उपग्रह नसताना, प्राचीन काळातील लोकांचे निसर्गाशी घट्ट नाते होते.

Ancient Wisdom | Agrowon

रंजक संकेत

अनेक पिढ्यांच्या निरीक्षणातून त्यांनी असे काही विचित्र पण वैज्ञानिकदृष्ट्या रंजक संकेत शोधून काढले होते.

Ancient Wisdom | Agrowon

प्राण्यांची अस्वस्थता

भूकंप किंवा सुनामी येण्यापूर्वी साप, उंदीर, पक्षी आणि कुत्रे विचित्र वागू लागतात. साप थंडीच्या दिवसांतही बिळातून बाहेर पडतात, तर पक्षी आपली घरटी सोडून आकाशात गोंगाट करत उडू लागतात.

Ancient Wisdom | Agrowon

मुंग्यांच्या रांगा आणि बेडकांचा आवाज

जर मुंग्या आपली अंडी तोंडात धरून उंच जागी जाताना दिसल्या किंवा संध्याकाळी बेडकांनी एकाच सुरात ओरडायला सुरुवात केली, तर प्राचीन लोक मुसळधार पाऊस येणार असल्याचे समजत.

Ancient Wisdom | Agrowon

पावसाचा वास आणि फुलांचे मिटणे

पाऊस पडण्यापूर्वी काही तास आधी मातीचा एक विशिष्ट सुगंध येतो आणि काही जंगली फुले आपोआप मिटतात. हवेतील आर्द्रता आणि दाब कमी झाल्याचे हे अचूक संकेत मानले जात.

Ancient Wisdom | Agrowon

चंद्राभोवतीचे खळे

रात्री चंद्राभोवती पांढरे किंवा रंगीत वर्तुळ दिसल्यास पुढील २४ ते ४८ तासांत वादळ किंवा पाऊस येण्याची शक्यता असते, असे प्राचीन खलाशी आणि शेतकरी मानत असतं.

Ancient Wisdom | Agrowon

श्वासाचा आणि घामाचा वास

प्राचीन काळातील वैद्य रुग्णाच्या श्वासाच्या वासावरून आजार ओळखत असत. उदाहरणार्थ, श्वासाला कुजलेल्या सफरचंदासारखा गोडसर वास येत असल्यास रक्तातील साखर धोकादायक पातळीवर गेल्याचे लक्षण मानले जात असे.

Ancient Wisdom | Agrowon

Anemia Symptoms : सतत थकवा येतो आणि त्वचा फिकट पडतेय? ही असू शकतात शरीरात रक्त कमी होण्याची लक्षणे

Anemia Symptoms | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...