Fodder Storage : असा साठवून ठेवा चारा ; होणार नाही खराब

Team Agrowon

सुका चारा साठवण करताना ज्यास्तीत ज्यास्त उंचीची गंज शक्यतो टाळावी. कारण असे न केल्यास तळाशी असलेले चाऱ्याची साठवण क्षमता खालावते, त्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता कमी होते.

Fodder Storage | Agrowon

जेथे पावसाळ्यात पाणी साठवून राहणार नाही अशा ठिकाणी साठवण करावी.चारा साठवणूक जमिनीपासून १ ते २ फुट उंचीवर लाकडाचे ओंडके ठेऊन किंवा दगडांच्या साहाय्याने करावी. जेणे करून सहज पावसाच्या पाण्याचा निचरा होईल.

Fodder Storage | Agrowon

पूर्व तयारी म्हणून चारा साठवण्यासाठीची जमीन एकसारखी समांतर करून घ्यावी.

Fodder Storage | Agrowon

डंबेल शेप पद्धतीत चाऱ्याची साठवण करावी. शेवटचा थर हा योग्य पद्धतीने लावून घ्यावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अणकुचीदार अवशेष वरती येणार नाहीत.

Fodder Storage | Agrowon

वातावरणातील घटकांपासून संरक्षण होण्यासाठी चारा चहूबाजुंनी झाकला जाईल यासाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर करावा.

Fodder Storage | Agrowon

चारा साठवणूक ही संपूर्ण सूर्यप्रकाश उपलब्ध असेल अशा ठिकाणी करावी जेणेकरून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आद्रतेमुळे बुरशीयुक्त घटकांची वाढ होणार नाही. चारा टिकण्यासाठी मदत होईल.

Fodder Storage | Agrowon

सुका चारा पचनास योग्य आणि अधिक पौष्टीक करण्यासाठी करावा लागणाऱ्या प्रक्रिया या साठवण करताना चाऱ्यामध्ये असणाऱ्या ओलाव्याचे प्रमाण यावरून कराव्यात.

Fodder Storage | Agrowon

https://agrowon.esakal.com/ampstories/web-stories/how-is-goats-milk-more-nutritious-than-cows-milk