Geyser Electricity Bill : थंडीत गिझरमुळे वीज बिल डबल येतंय? 'या' स्मार्ट टिप्स वापरून करा बिलात मोठी बचत!

Anuradha Vipat

वीज बिलात बचत

थंडीच्या दिवसांत गिझरचा वापर वाढल्याने वीज बिल जास्त येणे स्वाभाविक आहे, पण योग्य तापमान सेटिंग आणि वापराच्या वेळेचे नियोजन करून तुम्ही वीज बिलात मोठी बचत करू शकता.

Geyser Electricity Bill | agrowon

तापमान ५०°C ते ५५°C सेट करा

थर्मोस्टॅट ५०°C ते ५५°C वर सेट केल्यास पाणी आंघोळीसाठी योग्य गरम होते आणि विजेची मोठी बचत होते.

Geyser Electricity Bill | agrowon

गरज असेल तेव्हाच वापर

आंघोळीला जाण्याच्या फक्त १० ते १५ मिनिटे आधी गिझर सुरू करा आणि पाणी गरम झाल्यावर लगेच स्विच बंद करा.

Geyser Electricity Bill | agrowon

बादलीने आंघोळ करण्यास प्राधान्य द्या

शॉवरच्या तुलनेत बादलीने आंघोळ केल्यास गरम पाण्याचा वापर निम्म्याने कमी होतो. पाणी कमी लागल्यामुळे गिझर कमी वेळ चालवावा लागतो.

Geyser Electricity Bill | agrowon

नियमित सर्व्हिसिंग

गिझरच्या हिटिंग कॉईलवर पाण्यातील क्षार साचल्यास पाणी गरम होण्यासाठी जास्त वेळ आणि जास्त वीज लागते. वर्षातून एकदा गिझरची सर्व्हिसिंग केल्यास त्याची कार्यक्षमता वाढते.

Geyser Electricity Bill | agrowon

५-स्टार रेटिंगचा गिझर

तुम्ही नवीन गिझर घेणार असाल तर नेहमी ५-स्टार एनर्जी रेटिंग असलेला आणि कुटुंबाच्या गरजेनुसार योग्य लिटरचा गिझर घ्या.

Geyser Electricity Bill | agrowon

वीज बिल

हिवाळा सुरू होताच गरम पाण्यासाठी गिझरचा वापर वाढतो आणि महिन्याअखेरीस वाढलेले वीज बिल पाहून टेन्शन येते.

Geyser Electricity Bill | agrowon

Winter Smart Kitchen Hacks : थंडीत खोबरेल तेल आणि तूप घट्ट गोठून बसतंय? बाटली न कापता 'या' सोप्या ट्रिक्सने करा झटपट पातळ!

Winter Smart Kitchen Hacks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...