Anuradha Vipat
अनेक फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास ती जास्त काळ ताजी राहण्याऐवजी उलट लवकर खराब होतात.
कमी तापमानामुळे फळांमधील नैसर्गिक एन्झाईम्स निष्क्रिय होतात ज्यामुळे त्यांची पिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया पूर्णपणे थांबते.
फ्रीजमधील अतिथंड वातावरणामुळे केळीच्या साली मधील पेशींचे आवरण तुटते आणि ती झपाट्याने काळी पडतात.
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातून निघणाऱ्या इथिलीन गॅसमुळे फ्रीजमधील इतर भाज्या आणि फळे सुद्धा लवकर सडतात .
टरबूज खोलीच्या तापमानाला ठेवल्यास त्याचे पोषक तत्वे टिकून राहतात. मात्र, टरबूज चिरल्यानंतर ते काचेच्या डब्यात ठेवून तासाभरासाठी फ्रीजमध्ये थंड करू शकता.
आंबा फ्रीजमध्ये ठेवल्याने तो आतून कडक होतो आणि त्याची नैसर्गिक चव पूर्णपणे बदलते.
संत्री, मोसंबी आणि लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांना थंड हवेची ॲलर्जी असते. फ्रीजमधील अतिथंड आणि दमट हवेमुळे त्यांच्या सालींवर काळे डाग पडतात.