Anuradha Vipat
केसांची वाढ होण्यासाठी आणि ते मुळापासून घट्ट करण्यासाठी रासायनिक उत्पादनांपेक्षा घरगुती नैसर्गिक तेल अत्यंत फायदेशीर ठरते.
हे तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन केस गळती थांबवते आणि केसांना दाट व लांब बनवते.
खोबरेल तेल,कढीपत्ता ,जास्वंदाची फुले व पाने ,मेथी दाणे .
एका लोखंडाच्या किंवा जाड बुडाच्या कढईत खोबरेल तेल मंद आचेवर गरम करायला ठेवा.
तेल हलके गरम झाल्यावर त्यात मेथी दाणे, कढीपत्ता आणि जास्वंदाची फुले-पाने टाका.
मंद आचेवर हे तेल १० ते १५ मिनिटे उकळू द्या, जोपर्यंत पानांचा रंग गडद होत नाही आणि फुलांचा अर्क तेलात उतरत नाही. तेल थंड झाल्यावर गाळणीने गाळून एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांच्या मुळांना हलक्या हाताने गोलाकार मसाज करत लावावे.