Anuradha Vipat
हिवाळ्यात थंड हवामानामुळे ओठ सुकणे आणि फाटणे ही एक सामान्य समस्या आहे.
या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आणि ओठ मऊ ठेवण्यासाठी खोबरेल तेल, मध आणि तूप हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत.
रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे शुद्ध तूप किंवा लोणी लावावे. तुपामुळे ओठांमधील ओलावा टिकून राहतो.
खोबरेल तेलामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. दिवसातून २-३ वेळा ओठांवर खोबरेल तेलाचे काही थेंब लावल्याने कोरडेपणा कमी होतो.
ओठांवर थोडे मध लावून १० ते १५ मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ करावे. यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.
ताज्या कोरफडीचा गर ओठांवर लावल्याने जळजळ कमी होते आणि ओठांना थंडावा मिळतो.
अनेकदा ओठ सुकल्यावर ते ओले करण्यासाठी जीभ फिरवण्याची सवय असते. लाळेचे लवकर बाष्पीभवन होत असल्याने यामुळे ओठ अधिक जास्त कोरडे पडतात.