Anuradha Vipat
रात्रीच्या वेळी निरोगी आणि शांत झोप लागण्यासाठी पचनक्रिया हलकी असणे अत्यंत आवश्यक आहे.
रात्रीच्या जेवणात चुकीच्या भाज्या खाल्ल्यास अपचन, गॅस, पोट फुगणे आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे झोपेत वारंवार अडथळा येतो .
या भाज्यांमध्ये 'रॅफिनोज' नावाची जटिल शर्करा आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. रात्रीच्या मंद पचनक्रियेमुळे या भाज्या सहज पचत नाहीत.
टोमॅटोमध्ये 'टायरामाइन' नावाचे अमिनो ॲसिड असते, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवून झोप येण्यात अडथळा आणते.
दिवसा सॅलड खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे, पण रात्री कच्ची काकडी, गाजर किंवा मुळा खाणे टाळावे.
रात्रीच्या जेवणात कच्चे कांदे किंवा जास्त प्रमाणात लसूण वापरल्यास पचनसंस्थेचा दाह वाढू शकतो.
बटाट्यासारख्या स्टार्चयुक्त भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. रात्री शारीरिक हालचाली कमी असल्यामुळे हे स्टार्च चरबीच्या रूपात साठवले जातात.