Anuradha Vipat
महाराष्ट्रात भरली वांगी आणि वांग्याचे भरीत हे दोन्ही पदार्थ गावरान जेवणाची शान मानले जातात.
ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरम गरम भाकरीसोबत या पदार्थांची चव अप्रतिम लागते.
छोटी काटेरी वांगी,भाजलेले शेंगदाणे,भाजलेले सुके खोबरे,कांदा,आले-लसूण-कोथिंबीर पेस्ट ,कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला, हळद, धने-जिरे पूड, गरम मसाला, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता,मीठ, ताजी कोथिंबीर.
वांग्यांचे देठ थोडे कापून घ्या. वांग्याला मधोमध दोन काप द्या. एका भांड्यात शेंगदाण्याचे कूट, सुके खोबरे, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट/काळा मसाला, धने-जिरे पूड, गरम मसाला, थोडे तेल, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून छान एकजीव करा.
मिठाच्या पाण्यातून वांगी काढूनतयार केलेला मसाला वांग्यांमध्ये घट्ट दाबून भरा. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता. कांदा मऊ झाल्यावर बाजूला ठेवलेला उरलेला मसाला घाला.
आता मसाल्यात भरलेली वांगी सोडून २ मिनिटे तेलात छान परतून घ्या. नंतर त्यात १ कप कोमट पाणी घाला.
झाकण ठेवून मंद आचेवर वांगी मऊ होईपर्यंत १० ते १२ मिनिटे शिजवून घ्या. वरून कोथिंबीर भुरभुरा; तुमची चमचमीत भरली वांगी तयार!