Roshan Talape
बहुतेक लोक केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात, पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.
केळी पचवायला शरीराला उष्णतेची गरज असते, पण पाणी प्यायल्याने ही प्रक्रिया थांबते.
आयुर्वेदानुसार केळी खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास कफ आणि वात दोष वाढतात, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि अपचन होऊ शकते.
केळीत असलेले स्टार्च आणि फायबर्स हळू पचतात. अशावेळी पाणी प्यायल्याने पोट फुगते, ढेकरा येतात आणि अॅसिडिटी वाढते.
केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास घशात कफ साचतो, त्यामुळे सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता वाढते.
पोट फुगणे, थकवा, अपचन आणि घशात खवखव ही लक्षणे तुमच्या अयोग्य सवयींचे संकेत असू शकतात.
पाणी प्यायचे असल्यास, केळी खाल्ल्यानंतर किमान ३० मिनिटे थांबणे योग्य ठरते.