Anuradha Vipat
पोटात आणि छातीत होणाऱ्या सततच्या जळजळीवर केळे हे अत्यंत गुणकारी आणि प्रभावी फळ आहे.
पोटात आग पडल्यास केवळ एक पिकलेले केळे खाल्ल्याने लगेच आराम मिळतो.
केळ्यामध्ये नैसर्गिक अँटासिड गुणधर्म असतात. हे पोटातील अतिरिक्त आम्ल शोषून घेते.
केळे खाल्ल्याने पोटाच्या आतील थरावर एक मऊ आवरण तयार होते. हे आवरण पोटाला जळजळीपासून वाचवते.
पोटॅशियम शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवून आम्लाची निर्मिती कमी करते.
केळ्यातील फायबर पचनसंस्था साफ ठेवते, ज्यामुळे अपचन आणि गॅसमुळे होणारी जळजळ थांबते.
तुम्ही पपई किंवा खरबूज देखील खाऊ शकता. ही फळेही पोटाला थंडावा देतात.